अपहरणकर्त्यांच्या हातावर तुरी देऊन डॉ. मिनासे निसटले पैशांसाठी झाले होते अपहरण; पोलिसांकडून अपरणकर्त्यांचा शोध सुरु

Khozmaster
3 Min Read

देऊळगाव राजा:- तालुका प्रतिनिधी 

शहरातील दंतरोग चिकित्सक डॉ. जयेश मीनासे यांचे अज्ञात अपहरण कर्त्यांनी अपहरण केल्याची घटना ८ मेच्या रात्री ८ वाजता दरम्यान देऊळगाव राजा शहरात घडली.काही अंतरावर गेल्यानंतर शौचास जाण्याच्या बहाण्याने डॉ. मीनासे यांनी अपहरणकर्त्यांच्या हातावर तुरी देऊन स्वतःची सुटका करुन घेतली. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून केवळ पैशासाठीच डॉ. मीनासे यांचे अपहरण झाले असावे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक पानसरे यांनी ही बाब गांभीयनित घेत अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ विविध पथके रवाना केली आहेत.दंतरोग चिकित्सक डॉ. जयेश मीनासे यांचे शहरातच हॉस्पिटल आहे. ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता डॉ. मीनासे आपले हॉस्पिटल बंद करून शहरातील सिविल कॉलनिस्थित आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान, रामाने कॉम्प्लेक्ससमोर एका काळा रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाने मीनासे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत दुचाकीला कॉर्पिओ आडवी लावली. स्कॉर्पिओमधून उतरलेल्या तीन अपहरणकर्त्यांनी डॉ. मीनासे यांना तुमच्यामुळे अपघात होतांना वाचला, तुम्ही पोलीस स्टेशनला चला’ असे सांगून त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबुन सुसाट वेगाने गाडी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे दामटली. काही अंतरावर गेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी डॉ. मीनासे यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर डॉ. मीनासे यांच्या बँकखात्यातून फोन-पेद्वारे एकुन ९८ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. मीनासे यांनी उर्वरित रकमेचा ताळमेळ बसविण्यासाठी थोडा वेळ मागून घेत छत्रपती संभाजी नगरच्या आपल्या मित्राकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी सदर ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावलेले आपले साथीदार पाठवून दोन लाख रुपये बोलावून घेतले. त्यानंतर अपहरणकर्ते डॉ. मीनासे यांना घेऊन लासुर स्टेशन परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गेले. सदर ठिकाणर डॉ. मीनासे यांनी शौचास जाण्याच्या नावाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि लगतच असलेल्या हॉटेलमागे झापलेल्या लोकांच्या बाजूला जाऊन झोपत अंगावर चादर घेत झोपेचे सोंग घेतले. अपहरणकर्त्यांनी काही वेळ त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून न आल्याने अपरहणकर्ते निघुन गेले. दरम्यान, डॉ. मीनासे यांनी एका व्यक्तीच्या मोबाइलवरून आपल्या पत्नीला कॉल करून घडलेली हकिकत सांगितली. पत्नीने ही बाब नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांच्या मदतीने डॉ. मीनासे यांना घरी आणले.या प्रकरणी डॉ. मीनासे यांच्या फिर्यादीवरुन देऊळगाव राजा पोलिसांनी ९ मे रोजी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी तत्काळ तपासचक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज १० मे रोजी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला भेट देऊन तपास यंत्रणेला तपासकामी सुपना केल्या. अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे हे तपासावर जातीने लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, देऊळगाव राजा शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भेट घेऊन अपहरणकर्त्यांचा तत्काळ दडा लावण्याची मागणी केली.

0 9 5 5 1 8
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *