सहकार विद्या मंदिरमध्ये ऑपरेशन ‘सिंदूर’ नावाने शालेय इमारतीचे नामकरण

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  

स्थानिक सहकार विद्या मंदिरात ऑपरेशन ‘संदुर’ नावाने सीबीएसई इमारतीचे नामकरण १० मे रोजी करून शालेय प्रशासनातर्फे भारतीय सैन्य दलास मानवंदना देण्यात आली.जम्मू-कश्मिर मधील पहलगाम येथील बैंसरण घाटीमध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी आंतकवाद्यांनी २६ निर्दोष भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यांनी केलेल्या या भ्याड हल्लाचा केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरातून निषेध करण्यात आला. भारतीय स्त्रियांचे कुंकू आम्ही पुसले, असा संदेश या भ्याड हल्लातून देण्याचा प्रयत्न आंतकवाद्यानी केला. प्रत्येक भारतीय या घटनेने क्रोधिष्ट तर होताच पण ते दृश्य अपमानास्पद होते. मोदी सरकारतर्फे या घटनेचा बदला घेण्याचा संपूर्ण अधिकार भारतीय सैन्यदलास देण्यात आला. भारताच्या तिन्ही दलाने सामजस्य व अप्रतिम कारवाई करीत ७ मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मिरातील व पाकिस्तानमधील दहशतवाद्याचे अड्डे उध्दस्त करीत शेकडो अतिरेक्यांना यमसदनी पाठविले व पहलगाम हल्याचा बदला घेतला. या संपूर्ण मिलिटरी कारवाईला ऑपरेशन ‘सिंदुर’ नाव देण्यात आले. भारतीय स्त्रियांचे सिंदुर (कुंकू) पुसणाऱ्या एकाही आंतकवाद्याला आम्ही जिवंत ठेवणार नाही, असा कडक संदेश भारत सरकार व सैन्याने दिला. या पराक्रमी कारवाईचे सदैव आठवण प्रत्येक भारतीयाला असावी व भारतीय सैन्याचे शौर्य विद्यार्थ्यांना नेहमीच लक्षात असले पाहिजे, यासाठी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथील शालेय इमारतीला ‘सिंदुर’ हे नाव देवून भारतीय सैन्यदलाला मानाची सलामी देण्यात आली. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी अध्यक्षा कोमल झंवर यांच्याशी चर्चा करीत सदर नाव सीबीएसई इमारतीला देण्याचे निश्चित केले. दरम्यान, १० मे रोजी सदर इमारतीचे नामकरण ‘सिंदुर’ करण्यात आले. भारतीय सैन्यदलाने अद्भूत पराक्रम दाखवित भारतीय स्त्रियांच्या अपमानाचा बदला घेतला. यावेळी शालेय प्रशासनातर्फे भारतीय सैन्यदलाला मानवंदना देण्यात आली असून विद्यार्थ्यांना लहापणापासूनच या घटनेतुन प्रेरणा मिळत भारतीय सैन्यदलात सामील होण्याची भावना असेल असा विश्वास आहे. यावेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावर भारतीय सैन्याबदलचा गर्व व विश्वास दिसुन येत होता. याप्रसंगी सहकार विद्या मंदिरचे शिक्षकगण उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *