सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज शिवसेनेची तिरंगा रॅली

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने ११ मे २०२५ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नागरिकांसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केल आहे.भारतातील जम्मू-कश्मीर राज्यामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर पहलगाम येथे २२ एप्रील रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धडा शिकविण्याच्या तिन्ही सैन्य दलाला सूट दिली आणि भारतीय सैन्य दलाने सिंदूर ऑपरेशन राबविले. त्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांना सदैव पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला सुरु केला आहे. या हल्लाला भारतीय सैनिक मोठ्या शुरतेने प्रत्युत्तर देत आहेत. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारत मातेचे रक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यांमध्ये शिवसेनेच्या वतीने ११ मे रोजी तिरंगा रॅली काढण्याची आदेश शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजित करण्यात आले आहे. या तिरंगा रॅलीमध्ये देशभक्तीपर गीते, तिरंगाचा सन्मान आणि सैनिकांना मानवंदना देण्यात येणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे आणि भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी  केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *