बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
कृषी विभागाच्या योजना अधिक परिणामकारक राबवण्यासाठी पीक प्रात्यक्षिके शेतीशाळा राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न, कसे वाढेल याबाबत आ. संजय गायकवाड यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खते बियाणे पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध होतील खताची लिकिंग होणार नाही, योग्य कंपन्यांचे बियाणे कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याबाबत कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या.जिल्हा परिषद सभागृहात ८ मे रोजी आ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुका बुलढाणा व मोताळा यांची खरीप हंगाम पूर्व आढावा सभा पार पडली. या सभेला कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, बुलढाणा तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे, मोताळा तालुका कृषी अधिकारी रामदास शिरसाठ, मोताळा तहसीलदार हेमंत पाटील व विविध विभागाचे कार्यालयीन प्रमुख उपस्थित होते.या सभेमध्ये कृषी विभागाच्या वतीने तालुका कृ षी अधिकारी वैभव विश्वे यांनी खरीप हंगामामध्ये खते बियाणे उपलब्धता व वेगवेगळ्या मोहिमा राबविण्याबाबत सादरीकरण केले. कृषी विभागाच्या योजना अधिक परिणामकारक राबवण्यासाठी पीक प्रात्यक्षिके शेतीशाळा राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याबाबत आ. संजय गायकवाड यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या.मागील हंगामात मक्याचे क्षेत्र वाढत आहे. त्यानुसार यावर्षीही क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे वाढीव क्षेत्राची व उत्पादनाची माहिती नाफेडला देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी अडचण येणार नाही. कृषी विज्ञान केंद्र यांनी सोयाबीन कापूस तुर इत्यादी पिकांची आपल्या प्रक्षेत्रावर लागवड करावी, त्यावर येणाऱ्या कीड व रोगांची माहिती शेतकऱ्यांना वेळेपूर्वी कशी मिळेल याबाबत शिफारशी प्रसिद्ध करावे. फळबाग लागवड करताना शेवगा क्षेत्र वाढण्याबाबत प्रयत्न करावे. या हंगामात खतांची लिकिंग होणार नाहीत, याबाबत निविष्ठा विक्री केंद्रांना सूचना द्याव्यात नामांकित कंपन्यांचे बियाणे कृषी विक्रेता केंद्रांनी विक्रीसाठी उपलब्ध करावे, बोगस कंपन्यांची बियाणे विक्री होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. एमओपी खताची मागणी जास्त प्रमाणात करावे. खत बियाणे याबाबत उपलब्धता झाली नाही, तर कृषी विभागाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा व त्याचा क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकरी उत्पादक कंपनी व गटांना बांधावर खत उपलब्ध करून देण्याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावे. ठिबक सिंचन लॉटरी मागील वर्षी निघाली नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेपासून वंचित असून याबाबत शासन स्तरावर लॉटरी काढण्यासाठी कळवावे, अशा सूचना आ. संजय गायकवाड यांनी या बैठकीमध्ये दिल्या. या बैठकीला तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, संतोष थापा उपस्थित होते.
Users Today : 21