अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त लुंबिनी बुध्द विहार कपिल वस्तू नगर, शिवनी व लेबर कॉलनी कृषी नगर, बुद्ध विहार या ठिकाणी बाल धम्म संस्कार शिबिर संपन्न झाले. एक मे ते पाच मे या पाच दिवसांमध्ये मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आणि संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिरामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष पी. जे. वानखडे सर, जिल्ह्याचे सरचिटणीस नंदकुमारजी डोंगरे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.या शिबिराचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महानगर पूर्वचे अध्यक्ष गोरखनाथजी वानखडे हे होते. या पाच दिवसीय शिबिराला सिंधुताई शेगावकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण आणि क्रांती याविषयी मुलांना माहिती दिली. जिल्ह्याचे जेष्ठ संघटक आयु. रमेश गवई गुरुजी, आयु.डी.बी. शेगावकर,विलास बावस्कर, जयदेव खंडारे गुरुजी, आयु. भाऊसाहेब थोरात, आयु. कांताताई थोरात या केंद्रीय शिक्षकांनी थोर पुरुषांचे जीवन व कार्य बाबत मार्गदर्शन केले. या शिबिरांचे उदघाटन मा. पि. जे. वानखडे सर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते व जिल्ह्याचे सरचिटणीस नंदकुमारजी डोंगरे यांचे उपस्थितीत झाले. या बाल धम्म संस्कार शिबिरामध्ये दामोदरजी जगताप, प्रकाश शेगावकर, एकनाथ वानखडे, संतोष रायबोले, राजरत्न डोंगरे, विकी डोंगरे, गोकुळ गोपनारायण, जयदेव खंडारे, मनोहर वानखडे, गजानन निखाडे, शरद रायबोले, गजानन निखाडे, मधुकर दामले, मधुकर लबडे, परमेश्वर इंगळे, देवानंद पाटील, संजय तायडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुलांना संस्कारीत करण्याचे काम या पाच दिवसांमध्ये बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले. शेवटी पाचव्या दिवशी मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी केंद्रीय शिक्षक, शिक्षिका बौद्ध उपासक, उपासिका, बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या समारोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे महानगर शाखेचे सरचिटणीस संतोष रायबोले यांनी केले व डी.बी. शेगावकर गुरुजी यांनी आभार मानले. असे एका पत्रकार द्वारे जिल्ह्याचे प्रचार, प्रसार, पर्यटन सचिव संजय गवई यांनी कळवले आहे.
Users Today : 18