सहकार विद्या मंदिर सीबीएसईचा १०० टक्के निकाल ३२७ पैकी २१७ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

KHOZ MASTER
1 Min Read

 बुलढाणा :- जिल्हा प्रतिनिधी

स्थानिक सहकार विद्या मंदिर(सीबीएसई), ही निवासी व अनिवासी शाळेने यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत यश संपादन करत राज्यात शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. ३२७विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १०० टक्के यशाचे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.विद्यालयातील स्वरा जोशी हिने ९६.८० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच गणेश गायकवाड याने ९६.६० टक्के गुण घेत द्वितीय, अक्षित जयस्वाल ९६.४० टक्के तृतीय, आर्यन वाघ ९६ टक्के चतुर्थ, अभयसिंह परिहार ९५.८० टक्के पाचवा क्रमांक पटकावला विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले तर २१७ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर ९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत स्वरा जोशी, गणेश गायकवाड, अक्षित जयस्वाल, आर्यन वाघ, अभयसिंह परिहार, दर्शिल तिडके, ग्लोरी हेडाव, अनुष्का मंडळकर, इशिता सिरसाट, पार्थ कदम, निरंजन इंगोले, आर्यन खासबागे, व्यंकटेश येवले, साई सदावर्ते, यज्ञेश राठोड, उमेश शेळके, प्रथमेश गवळी, अवनी सावजी, स्वराज घुगे, दिया चंदराणा, अनुश्री भवटे, तन्मय एन्डोले, वंशिका जाधव, वरद शेदुते या विद्यार्थ्यांनी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत विद्यार्थ्यांना बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, संस्थेच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर, तसेच प्राचार्य व मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *