मेहकर :- तालुका प्रतिनिधी
चिखली मार्गावरील साई मोटर्स गॅरेजला बुधवारी सकाळी आग लागून साहित्य खाक झाले. या आगीत सुमारे ८ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.नागझरी बु, येथील शंकर शिवसिंग गोलाईत यांचे मेहकर येथे साई मोटर्स नावाचे गॅरेज आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास अचानक गॅरेजमध्ये आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर गॅरेजमधील साहित्य, उपकरणे आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. घटनेनंतर मेहकर येथील ग्राममहसूल अधिकारी यांनी पंचनामा केला. यावेळी शंकर गोलाईत, रमेश पवार, समाधान निकस, विशाल तराळ, विश्वास राऊत उपस्थित होते. या आगीत ८.४९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
Users Today : 26