रजा संपवा; शिल्लक रजेच्या पैशांसाठी एसटीत ‘वेटिंग’!

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजा रोखीकरणाची सवलत उपलब्ध असून, कार्यरत कर्मचाऱ्यांना या रजांच्या बदल्यातील रक्कम साधारणतः महिनाभराच्या आत मिळते. त्यामुळे सेवा सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा त्वरित लाभ होतो; मात्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून, त्यांना रक्कम मिळण्यासाठी निधी मंजुरीची वाट पाहावी लागते.यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या विषयावर आंदोलने केलेली आहेत तरीही प्रश्न कायम आहे. एसटी कर्मचाऱ्यांना रजा किती? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना महिन्याला सरासरी अडीच दिवसांची रजा मिळते. त्यानुसार, वर्षभरात एकूण ४२ रजा मंजूर केल्या जातात. ही रजा संरचना एसटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या स्वरूपानुसार ठरवली गेली आहे. कर्मचाऱ्यांना अवकाश आणि विश्रांती मिळण्यासाठी आहे.किती रजांचे पैसे मिळतात ? एसटी कर्मचाऱ्यांना रजा साठवून ठेवण्याचा हक्क आहे. ३० दिवसांचे पैसे, तर १५ दिवसांच्या रजा कर्मचाऱ्याला मिळतात. उर्वरित १५ दिवस रजा स्वरूपातच राखून ठेवता येतात. रजेचे पैसे रजेच्या रोखीकरण स्वरूपात दिले जातात. निवृत्तीच्या वेळी किंवा अधिवर्ष सेवेनंतर. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील न वापरलेल्या रजांचा आर्थिक लाभ घेता येतो.वर्षभरापासून ‘वेटिंग’ सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजांचे पैसे मिळण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागत आहे. सेवा पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या रजेच्या रोखीकरणासाठी कर्मचाऱ्यांना वेळेवर रक्कम न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे ही प्रक्रिया लांबते. निधी मंजूर झाल्यानंतरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात रकमेचा भरणा केला जातो. शिल्लक रजांचे पैसे कधी मिळतात ? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिल्लक रजांच्या बदल्यात मिळणाऱ्या रकमेचा अभिप्राय कालावधी महिना ते दोन महिने HU;असतो.कर्मचाऱ्यांनी वापरात न आणलेल्या रजा शिल्लक राहिल्यास, त्या रजेच्या रोखीकरण स्वरूपात मंजूर केल्या जातात. संबंधित विभागाकडून प्रस्ताव सादर केल्यानंतर, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.

0 9 5 5 1 9
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *