नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची गोदावरीत आत्महत्या परिक्षा फॉर्म भरु न दिल्याने नैराश्यात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

KHOZ MASTER
1 Min Read

नांदेड :- तालुका प्रतिनिधी

शहरातील नर्सिंग महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने हस्सापूर येथील पुलावरून गोदावरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या तीन दिवसांपासून पुनीत हा बेपत्ता होता. घटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच महाविद्यालयातील शिक्षकांकडून असाईनमेंट आणि परीक्षा फॉर्मबाबत त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे.

 

पुनीत वाटकर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा अमरावती येथील आहे. तो आणि त्याची बहीण शहरातील लोट्स नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी होते. पुनीत हा नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात होता. महाविद्यालयाने दिलेल्या वेगवेगळ्या विषयांतील प्रात्यक्षिक सादर केल्याशिवाय परीक्षा फॉर्म भरता येणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे पुनीतसह अनेक विद्यार्थी नैराश्यात होते. त्यातच १२ मे रोजी त्यांनी गोदावरीत उडी मारून आत्महत्या केली. पुनीत बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. गुरुवारी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर संतप्त झालेल्या पुनीतच्या कुटुंबीयांनी आणि विद्यार्थ्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *