नागपूर शहरात घरफोडीची घटना – 3.38 लाख रुपयांचा ऐवज लंपास
नागपूर, 15 मे 2025: अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काशी नगर परिसरात घरफोडीची एक गंभीर घटना घडली असून अज्ञात चोरट्याने तब्बल 3,38,425 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद दाखल झाली आहे. ही घटना 13 मे ते 14 मे दरम्यान घडली.
फिर्यादी रोहित किशोर रगडे (वय 35), रा. प्लॉट नं. 28, रामेश्वरी रोड, काशी नगर, हे आपल्या कुटुंबासोबत अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. घराला कुलूप लावून 13 मे रोजी सकाळी 8 वाजता बाहेर पडले होते. 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश करताच कपाटातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत सापडले. त्यांनी तपासणी केल्यावर सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून आली नाही.
फिर्यादीनुसार, चोरी गेलेला ऐवज असा आहे:
सोन्याचे हार (2 नग) – अंदाजे किंमत ₹1,25,000
कर्णफुले व साखळी – ₹50,000
सोन्याच्या अंगठ्या (8 नग) – ₹70,000
मनगटी व लॉकेट – ₹35,000
चांदीचे बांगडी, कडे, सिक्के, अंगठ्या, चेन, कमरबंद – एकूण ₹48,425
रोख रक्कम – ₹10,000
अशा प्रकारे एकूण अंदाजे ₹3,38,425 किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305(अ), 331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून पोलीस तपास सुरू आहे.
पोलीस तपास सुरु आहे. नागरिकांना सतर्क राहून घर बंद करताना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 21