घरातून ६५ हजारांचा ऐवज लंपास…

Khozmaster
1 Min Read
खामगाव :- तालुका प्रतिनिधी
शहरातील घाटपुरी रोडवरील गणपती नगरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २१ मे रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती नगरातील रहिवासी गोपालसिंग भिकूसिंग पवार यांचे भाऊ कुटुंबासह बाहेरगावी गेले असून घराला कुलूप लावले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने २१ मे रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट फोड़न सुमारे २५ हजार रुपये रोख रक्कम व ४ सोन्याच्या बांगड्या (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळी गोपालसिंग पवार भावाचे घर पाहण्यासाठी गेले असता घराचे दरवाजे उघडे व घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला .
0 9 5 5 1 9
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *