बुलडाणा :- जिल्हा प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या तोंडावर आलेल्या असताना जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथ आहे. १,५०० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत खूपच कमी कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे वाटपास तत्काळ गती न आल्यास उद्धवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. २३ मे रोजी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर उद्धवसेनेच्या पदाधकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनानुसार, खरीप हंगामात सुमारे साडेसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना उद्धवसेनेचे पदाधिकारीव कार्यकर्ते. लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड अपेक्षित आहे. मात्र, शेतकरी आर्थिक संकटात असून, मागील हंगामातील उत्पादनाला कमी दर मिळाल्याने निराशा वाढली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे यासाठी बँकांना योग्य सूचना देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. बँकांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी, अडथळे आणि विलंब यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून कार्यवाही करावी, अशी मागणी बुधवत यांनी केली. सर्कलनिहाय पीककर्ज वाटपाचे लेखाजोखा उपलब्ध करावा, खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, भरारी पथके सक्रिय करावीत यासह अन्य मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
Users Today : 21