योगगुरू मनोहर इंगळे यांचा योगमार्गावर महत्त्वाचा संदेश

Khozmaster
1 Min Read

“माणसाची शारीरिक व मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे, तेव्हाच अध्यात्मिक प्रगती साध्य होऊ शकते. मानव योनीत जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाने योगाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे जीवनात सुख, शांती व समाधान मिळते. त्यासाठी नेहमी डोळ्यांसमोर दवाखाना, कारागृह आणि स्मशान यांची आठवण ठेवावी,” असे योगगुरू मनोहर इंगळे यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

आज सकाळी शिवतेज प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त योगवर्गात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. निःशुल्क योगवर्गात भाग घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा दररोज योग अभ्यासाचा विश्लेषण केला जात आहे.

कार्यक्रमात अनिता केडीया, विनोद भसीन, रामेश्वर सपकाळ व बाळासाहेब काळे यांनी योगाच्या महत्त्वाबाबत आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक रामप्रकाश मिश्रा होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरूण बंसल, जसवंतसिंग मल्ली, पुरुषोत्तम गुप्ता, शंकरसिंग कुंडलवार, संजय मनतकार, गणेश भांडे, शिवतेज इंगळे, अरूण देशमुख तसेच अनुराधा इंगळे, वंदना तायडे, स्मिता केडीया, ज्योती वानखडे व शालीनी राठोड यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचा समारोप शांतीपाठाने करण्यात आला.

0 9 5 5 2 0
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *