श्रावणात शिवकथेनं भक्तिमय वातावरण; दीपशरण महाराज यांचे मार्गदर्शन

KHOZ MASTER
1 Min Read

बुलडाणा (प्रतिनिधी):
श्रावण महिन्याच्या पवित्र निमित्ताने सद्भावना सेवा समितीतर्फे आयोजित सात दिवसीय शिवमहापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बाल संत दीपशरण महाराज यांचे ज्ञानसंपन्न प्रवचन भक्तांवर मंत्रमुग्ध करीत आहे.

🕉 शिवकथेचे महत्व अधोरेखित

कथेमध्ये श्रावण महिना, पार्वतीचे तप आणि शिवकथेचे अध्यात्मिक महत्व सांगताना दीपशरण महाराज म्हणाले, “श्रद्धा आणि विश्वासातून भक्ती निर्माण होते. मनुष्यजन्म परमसौभाग्याचा असून, शिवकथेचे श्रवण हे भक्तीमार्गातील सर्वोच्च फल आहे.”

📿 धार्मिक विधींनी प्रारंभ

कथेच्या प्रारंभी बारा ज्योतिर्लिंगांचे पूजन व रुद्राभिषेक पार पडले. यामध्ये जैस्वाल समाजातील प्रमुख यजमान म्हणून निलीमा जयशंकर जैस्वाल, सागर लक्ष्मीकांत जैस्वाल, प्रतिक्षा सोनवणे, अभिजीत जयप्रकाश जैस्वाल, सितादेवी शर्मा यांच्यासह अनेक भाविकांनी सहभाग घेतला.

🌸 स्त्री सहभाग आणि सेवा कार्य

आजच्या दिवसाचे आयोजन जैस्वाल समाज महिला मंडळाकडे होते. सुवर्णाज्योती जैस्वाल, रत्ना, उषा, प्रेमलता, अनिता, शिल्पा जैस्वाल यांनी रुद्राभिषेक, पार्थिव शिवलिंग तयार करणे आणि आरती यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. प्रसाद वितरणाची जबाबदारी जांगीड समाजाने पार पाडली.

🎶 मराठी भजनांनी भाविक भावविभोर

दीपशरण महाराजांनी सादर केलेले ‘विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा’ हे मराठी भजन गाताच श्रोते वर्ग भान हरपून भक्तिरसात रंगून गेले. यावेळी त्यांनी बुलडाणा शहरातील महिला श्रोते आदर्श आहेत, असे गौरवोद्गारही काढले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *