मेहकर (प्रतिनिधी):
“मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी ‘न भूतो न भविष्यति’ अशी विक्रमी विकासकामे खेचून आणली. परंतु त्यांचा पराभव वैयक्तिक नाही, तर मतदारसंघाच्या दृष्टीने मोठे नुकसान ठरले आहे,” असे स्पष्ट मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मापारी यांनी व्यक्त केले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना मापारी म्हणाले:
🛠 विकासकामांचा विक्रम – ₹४,००० कोटींचा निधी
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात डॉ. रायमूलकर यांनी अडीच वर्षांत चार हजार कोटी रुपयांचा विकासनिधी मतदारसंघासाठी खेचून आणला. हे निधीचे प्रमाण यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नाही. आजही त्या निधीतील विकासकामे प्रगतीपथावर असून पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहेत.”
🕴 सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व
“डॉ. रायमूलकर हे जनतेच्या सुखदुःखात सतत सहभागी असणारे नेते आहेत. ते आजही आमदार नसतानाही २४ तास जनतेसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या पराभवामुळे मतदारसंघाच्या विकासाच्या गतीला खीळ बसली आहे. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव सर्वांनाच होऊ लागली आहे.”
🗣 स्पष्टवक्तेपणा हीच त्यांची ओळख
“त्यांचे बोलणे स्पष्ट असते. मनातले तेच ते ओठांवर ठेवतात. हेच काहीजणांना रुचले नाही आणि गैरसमजांमुळे निवडणुकीत त्यांच्याविरोधात काम झाले. पण डॉ. रायमूलकर यांनी मोठ्या मनाने सर्वांना माफ केले आणि पुन्हा जनसेवेत स्वतःला झोकून दिले आहे,” असे मापारी यांनी सांगितले.
📣 जनतेने नेतृत्व जपावे – मापारी यांचे आवाहन
“आजच्या काळात असे संवेदनशील, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेते दुर्मिळ आहेत. त्यामुळे जनतेने अशा नेत्याला जपले पाहिजे,” असे आवाहनही संतोष मापारी यांनी यावेळी उपस्थितांना केले.
Users Today : 25