असा कसा रे तू मित्र वैरी! जिवलग मित्रानेच धाडले मित्राला यमा सदनी…

Khozmaster
2 Min Read

सतिश मवाळ

देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील रहिवासी असलेले बुलडाणा शासकीय नोकरीतील सहकारी असलेल्या ५० वर्षीय सुधाकर इंगोले यांना जुन्या भांडणाच्या वादातून आपल्या साथीदाराच्या सहकाऱ्याने जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यावेळी जखमी अवस्थेत सुधाकर इंगोले यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.दरम्यान सुधाकर यांचे चुलत भाऊ गजानन रामदास इंगोले रा . देऊळगाव माळी तालुका मेहकर यांनी ३० सप्टेंबर रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बुलढाणा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या राजीव लहाने याच्यासह ३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी राजीव लहाने ह्याला अटक करण्यात आले आहे. अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्याकडून मिळाली आहे. दरम्यान औरंगाबाद येथे सुधाकर इंगोले उपचारादरम्यान २ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला असून आरोपी विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मूळ देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील ह. मु.बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय सुधाकर लक्ष्मण इंगोले हे आगोदर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत होते. सध्या लोणार ग्रामीण रुग्णालयात त्यांची बदली झालेली होती. जिल्हा रुग्णालयात कार्यरत राजीव लहाने व सुधाकर इंगोले अनेकवेळा दोघेही सोबत जेवायला जात होते.दरम्यान २५ ऑक्टोबर रोजी स्थानिक धाड नाक्यावर सुधाकर इंगोले हे जखमी त्याच्या डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रथम बुलढाणा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले नंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान 2 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

गजानन इंगोले यांच्या तक्रारीवरून वरून बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी राजीव लहाने व त्यांच्या २ सहकाऱ्यांविरुद्ध कलम ३०७ भादवी ३४ नुसार खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपी राजीव लहाने यास अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *