जळगाव जामोद, :- प्रतिनिधी
जळगाव जामोदचे आमदार, माजी मंत्री व भाजप नेते डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला कुटे (वय ८१) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, राज्यभरातून अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस हे वैजापूरहून दुपारी सव्वातीन वाजता जळगाव जामोद येथे दाखल झाले. त्यांनी ४० मिनिटे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन उर्मिला कुटे यांना श्रद्धांजली अर्पण केली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या वेळी उपस्थित मान्यवर:
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
- कामगार मंत्री आकाश फुंडकर
- विभागीय उपायुक्त अजय लहाने
- अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे
- उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार
- प्रभारी पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा
- अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड
- उपविभागीय अधिकारी शैलेश काळे
- उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील
कुटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक व शासकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही भेटी दिल्या आहेत.
