लासुरा-मेंढळी रस्त्यावरील पूल दुरुस्तीची मागणी : शिवसेना (उबाठा)चा जि.प. बांधकाम विभागाला इशारा

Khozmaster
1 Min Read

मलकापूर, प्रतिनिधी
तालुक्यातील लासुरा-मेंढळी रस्त्यावरील विश्ववगंगा नदीवरील पूल पावसाळ्यात वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. या पूलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा जोरदार इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे देण्यात आला आहे. जि.प. अभियंता सोळंके यांना निवेदन सादर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास, उपशहर प्रमुख शकील जमादार, किसानसेना शहर प्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूकसेना शहर प्रमुख इमरान लकी, विभाग प्रमुख चांद चव्हाण, तसेच शेख फरहान, जावेदखान, शेख मोहसीन शेख छोटू, पुरुषोत्तम अढाव, रमेश अढाव, रामपाल राजपूत, शंकर बगाडे, भास्कर बगाडे, जितेंद्र पारस्कर आदींनी संयुक्त निवेदनाद्वारे आपली मागणी मांडली.

निवेदनातील मुद्दे:

  • लासुरा-मेंढळी मार्गावरील पूल जोरदार पावसामुळे पूर्णतः वाहून गेला आहे.
  • ग्रामस्थांना शेतात ये-जा करण्यासाठी नदी पात्रातून चालत जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे.
  • प्रशासनाने याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास सामूहिक आमरण उपोषण करण्यात येईल.
  • शासन व प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
  • अन्यथा आंदोलन उग्र रूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0 9 5 5 2 3
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *