दिव्यांग बालकांसाठी वैद्यकीय निदान व उपचार शिबिर संपन्न

Khozmaster
1 Min Read

चिखली :- प्रतिनिधी
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे *अखिल भारतीय शिक्षा समागम सप्ताह* निमित्त विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग बालकांसाठी *वैद्यकीय निदान व उपचार शिबिर* आयोजित करण्यात आले. हे शिबिर *समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रम, **जिल्हा परिषद बुलढाणा* व *राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा* यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ऑगस्ट रोजी पार पडले. शिबिराचे अध्यक्षस्थानी *गटशिक्षणाधिकारी प्रकाश सपकाळ* होते, तर *गटसमन्वयक प्रवीण वायाळ* यांच्या नियोजनाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले. यावेळी *केंद्रप्रमुख प्रकाश केवट* यांनी पालकांना मार्गदर्शन केले. शिबिरात *अरिफ बेग, प्रवीण वायाळ, माया बडगे* यांनी मिळून एकूण *११५ प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी* केली. त्यापैकी *५८ विद्यार्थ्यांना पुढील उपचार व शैक्षणिक सुविधांसाठी जिल्हास्तरावर संदर्भित* करण्यात आले. या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात *शैक्षणिक साहित्य, विशेष सुविधा, प्रमाणपत्र* व आवश्यक सहाय्य दिले जाणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी *अनुराधा प्रकाश जाधव, अमोल पाटील, संतोष खरात, श्रीनिवास बोडखे, विजय सोनुने, पुष्पोत्तम झाडे, संजय रिंढे, सचिन तायडे, वैशाली जाधव, ईश्वर इंगळे* आदींनी मोलाचे सहकार्य केले.

0 9 5 5 2 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *