ढगफुटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान; शासनाकडून ७४.४५ कोटींची मदत मंजूर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा :- :- जिल्हा प्रतिनिधी

जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे आठ मंडळांमध्ये एकूण ८७,३९०.२२ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून, ९०,३८३ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश मिळत शासनाने ७४ कोटी ४५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ना. जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत ६ ऑगस्ट रोजी शासनाने परिपत्रक काढून मदतीला मंजुरी दिली.
मेहकर-लोणार तालुक्यांना सर्वाधिक फटका या अतिवृष्टीमध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यांना विशेष फटका बसला आहे. फक्त मेहकर मतदारसंघातच ६५,६०१ हेक्टर शेती क्षेत्रात नुकसान झाले असून, ६६,००० शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या भागातील एकूण नुकसानाचा अंदाज ६६८ कोटी रुपये इतका आहे. पावसामुळे काही भागांमध्ये जमीन खरडून गेली, फळबागांचे मोठे नुकसान झाले, तसेच गाळ साचल्यामुळे पिके नष्ट झाली. यामुळे सुमारे ६,००० शेतकरी अधिक गंभीरपणे बाधित झाले आहेत. शासनाच्या निर्णयाबद्दल आभार या तातडीच्या निर्णयाबद्दल ना. प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमूलकर यांनी समाधान व्यक्त केले असून, “मतदारांना दिलेला शब्द पाळला गेला,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *