शारा येथे भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना; आमदार सिद्धार्थ खरातांचा समता, बंधुभाव आणि प्रगतीचा संकल्प – दहा लाखांच्या सामाजिक सभागृहाची घोषणा

Khozmaster
1 Min Read

मेहकर :- शहर प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील शारा गावात भव्य, देखणी आणि प्रसन्न मुद्रा असलेली बुद्धमूर्ती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्थापित करण्यात आली. या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला व गावासाठी दहा लाख रुपयांच्या सामाजिक सभागृहाच्या उभारणीची घोषणा केली. महिला मंडळ, स्थानिक कार्यकर्ते आणि गावातील तरुणांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करत आमदार खरात म्हणाले, “हा बुद्धविहार केवळ दगडाची मूर्ती नसून बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे स्फूर्तीस्थान आहे. बंधुभाव, समता आणि प्रगतीसाठी आपण एकत्रितपणे कार्य केले पाहिजे.” त्यांनी सुचवले की, पौर्णिमा किंवा ठराविक दिवशी विचारमंथन, प्रवचन आणि चर्चासत्रांचे आयोजन करून बुद्धविहाराला प्रगती, संस्कार आणि नियोजनाचे केंद्र बनवावे. मूर्तीची प्रतिष्ठापना पूजनीय भंते प्रज्ञाशीलजी यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी ॲड. अनंत वानखेडे, ॲड. संदीप गवई, प्रा. संजय वानखेडे, लक्ष्मण मोरे, पी.बी. इंगोले, न.ल. खंडारे, एकनाथ बोर्डे, अशोक काकडे, शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष तारामती जायभाये यांसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. अशोक लहाने यांनी मानले.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *