मेहकर :- शहर प्रतिनिधी
मेहकर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या घरी राखी पौर्णिमेनिमित्त बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पवित्र रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी वर्ग १२ वी मध्ये शिकणारी पुजा लक्ष्मण तांगडे, शिवसेना महिला आघाडी लोणार तालुका अध्यक्ष तारामती जायभाये, काँग्रेसच्या आरती दिक्षित, संजीवनी वाघ, जयाताई गायकवाड ,लता मोरे,मीना मोरे,साधना अवसरमोल,आशा भारशंकर, सुजाता अवसरमोल,जया भारशंकर,इंदु पाईकराव, सुनीता साळवे, कुसुम मोरे,पंचशीला अवसरमोल,रेखा भारशंकर (पिंपळनेर ता.लोणार) शारा येथिल फासे पारधी समाजाच्या शितल राजू पवार, संगीता शेषराव पवार, ताई रवि पवार, कल्पना तुफान पवार, ललिता नाना पवार, भाग्यश्री शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी आमदारांच्या निवासस्थानी हजेरी लावली. सर्वांनी प्रेमाने राखी बांधत, “उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि आमचा लाडका भाऊ मंत्री व्हावा” अशी सदिच्छा व्यक्त केली.अल्पावधीतच मतदारसंघात भक्कम स्थान निर्माण करत जनतेच्या मनात घर करणारे, शांत, संयमी व उच्च शिक्षित अशा प्रतिमेचे आमदार खरात हे महिलांच्या दृष्टीने ‘लाडका भाऊ’ ठरले आहेत. या निमित्ताने बोलताना ते म्हणाले, “मतदारसंघातील सर्व बहिणी माझी ताकद आहेत. निवडणुकीत तुम्ही दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. अडीअडचणीच्या काळात हा भाऊ नेहमी तुमच्या पाठीशी असेल.”
Users Today : 28