चिखली (प्रतिनिधी) – बहीणभावाच्या निर्मळ नात्यातील स्नेह आणि एकोपा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील विविध गावांमधून घरी आलेल्या भावांना दरवर्षीप्रमाणे यंदाही आ. श्वेता महाले यांनी राख्या बांधून शुभेच्छा व्यक्त केल्या. भावंडांबद्दलची आपुलकी व्यक्त करत आ. महाले म्हणाल्या, “हे असंख्य भाऊ माझ्या पाठीशी आहेत, म्हणूनच जनतेच्या समस्यांशी लढण्याचे बळ मिळते.” रक्षाबंधनाचा हा उपक्रम प्रेम, विश्वास आणि बांधिलकी दृढ करणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले. सणाच्या निमित्ताने गावागावांत उत्साहाचे वातावरण होते, तर भावंडांच्या भेटीगाठींनी सणाचा आनंद द्विगुणित झाला.
