चिखलीत श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीची ३७ वी वार्षिक सभा; आमदार श्वेताताई महाले व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली (प्रतिनिधी) – चिखली येथे आज श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत संस्थेचे संचालक, सभासद व ग्राहकांशी संवाद साधत बँकेच्या कार्यप्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्राहकांसाठी भविष्यातील नवीन योजना आणि विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या वार्षिक सभेस केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *