राष्ट्र विकासासाठी सजग व जबाबदार नागरिक आवश्यक… प्रा. डॉ. गणेश घुगे

KHOZ MASTER
2 Min Read

देऊळगाव राजा :- तालुका प्रतिनिधी
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालय व नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड यांच्यातील सामंजस्य करारानुसार श्री व्यंकटेश महाविद्यालयात, इतिहास विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त (09 ऑगस्ट) दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नारायणराव नागरे महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ गणेश घुगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गणेश घुगे यांनी प्राचीन काळात भारतीय समाज हा विविध जाती-धर्मात विभागल्यामुळे 1206 नंतर देशावर इस्लामची तर 1757 नंतर ब्रिटिशांनी आपली एकसंघ सत्ता निर्माण केली. अन्यायकारक ब्रिटिश राजवट भारतातून हद्दपार करण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने आंदोलने झाली. त्यामध्ये 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरु झालेले ‘भारत छोडो’ आंदोलन हॆ निर्णायक ठरले. या आंदोलनात गांधीजींनी जनतेला ‘करा अथवा मरा’ चा नारा दिला. त्यातूनच ब्रिटिशांनी 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य दिले, असे मत व्यक्त केले. देशाला एकसंघ ठेवून देश विकास साधायचा असेल, तर तरुणांनी इतिहासापासून बोध घेऊन जबाबदार नागरिक बनले पाहिजे, हीच स्वातंत्र्य आंदोलनातील शहिदांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आज आपण स्वतंत्र भारतात राहत असलो, तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात देशभक्तांच्या बलिदानाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. तसेच समाजविघातक प्रवृत्तींपासून सावध राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या संरक्षणासाठी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. तृतीय वर्षाची विद्यार्थीनी कु. निशा मोरे हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्रसिंग देवरे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार बी. ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी विष्णू वखरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *