सुरमयीच्या स्वरातील निरागसतेला अमृता फडणवीसांची दाद‘ नयी राहों पे…’ अल्बमचे नागपुरात थाटात प्रकाशन

Khozmaster
2 Min Read

सुरमयीच्या स्वरातील निरागसतेला अमृता फडणवीसांची दाद‘

नयी राहों पे…’ अल्बमचे नागपुरात थाटात प्रकाशन

नागपूर, 11 ऑगस्ट – वयाच्या केवळ चौदाव्या वर्षीच आपल्या गोड आवाजाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या सुरमयी साठेच्या आवाजातील निरागसता ही दैवी देणगी असून, ती जपावी असा सल्ला प्रसिद्ध गायिका व बँकर अमृता फडणवीस यांनी दिला.

रविवारी हॉटेल सेंटर पॉईंट येथे सुरमयीच्या पहिल्या ओरिजिनल म्युझिक अल्बम ‘नयी राहों पे…’ चे प्रकाशन अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी आमदार संदीप जोशी, सेंटर पॉईंट स्कूल दाभाचे प्राचार्य परवीन कसाड, सुरमयीचे वडील सुबोध साठे (फोटोग्राफर, गायक, गिटार वादक व टेनिसपटू) तसेच आई अरुंधती साठे (इंटेरियर डिझायनर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “सुरमयीने वयाच्या योग्य टप्प्यावर संगीत प्रवास सुरू केला आहे. मी स्वतः या क्षेत्रात उशिरा आले, त्यामुळे मला अधिक मेहनत करावी लागली. पण सुरमयीने कोणाचेही अनुकरण न करता स्वतः रचलेली आणि गायलेली गाणी मनाला सुखावणारी आहेत.”

आमदार संदीप जोशी यांनी सुरमयीच्या बालपणाच्या आठवणी सांगत, तिचा संगीत प्रवास आजोबा प्रकाश साठे यांच्यापासून सुरू होऊन वडील सुबोध साठे यांच्या माध्यमातून आज सुरमयीपर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. परवीन कसाड यांनी तिच्या कल्पकतेचे, निष्ठेचे आणि समर्पणभावाचे कौतुक केले.

सुबोध आणि अरुंधती साठे यांनी सुरमयीच्या संगीत प्रवासाच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा देताना, टेनिस खेळताना तिला गाण्याची प्रेरणा कशी मिळाली हे सांगितले. “भविष्यात अधिक चांगले काम करणे आणि सातत्याने शिकत राहणे, हीच माझी इच्छा आहे,” असे सुरमयीने व्यक्त केले.

सुरमयीची गाणी surmayee.com तसेच विविध सोशल मीडियावर उपलब्ध असून, रसिकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सॅव्हियो जॉन, पिंकू जोसेफ, मंजुषा फडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मिहिका जोशी आणि गायत्री बंड यांनी केले.

 

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *