मानकापूर पोलिसांची मोठी कामगिरी – दोन घरफोडी आरोपींना अटक, चार गुन्ह्यांचा उलगडा

Khozmaster
2 Min Read

मानकापूर पोलिसांची मोठी कामगिरी – दोन घरफोडी आरोपींना अटक, चार गुन्ह्यांचा उलगडा

नागपूर, दि. ११ जुलै २०२५ – मानकापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून एकूण चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे.

दिनांक १० जुलै २०२५ रोजी राष्ट्रसंत नगर, झिंगाबाई टाकळडी येथील सौ. नलिनी विनायक ठाकरे (वय ५९) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५५,००० रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता. फिर्यादींच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी असलम अजहर काजी (वय २४, रा. यशोधरानगर) व करण उर्फ कन्ना विनोद पाटील (वय २५, रा. बिलाल नगर, यशोधरानगर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी केवळ सदर घरफोडीच नव्हे, तर मानकापूर हद्दीत आणखी दोन घरफोड्या व क्रमणा पोलीस ठाणे हद्दीत एक वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून रोख ४,३०० रुपये, कावासाकी ३०० सीसी मोटरसायकल (क्र. MH-31-BG-6010) व काळ्या रंगाची हिरो मोटरसायकल (क्र. MH-49-A-2139) असा एकूण ३,४३,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी मा. श्री. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर; मा. श्री. नवीनचंद्र रेड्डी, सहपोलीस आयुक्त; मा. श्री. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग); मा. श्री. नित्यानंद झा, पोलीस उपआयुक्त (परि. क्र. २); व मा. श्रीमती सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत वपोनि. हरीश काळसेकर, दुपोनि. अमोल इंगोले, पोउपनि. अमित देशमुख, बजरंग खोमने, सुनिल डगवाल, पोहवा. राजेश भरने, राहुल गवई, विजय यादव, पोअं. अनुप यादव, प्रविण भोयर, योगेश महल्ले, प्रशांत खंडारे, विपीन रक्षे, प्रोमेन्द्र खराबे, कैलास मुळे यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.

पुढील तपास सुरू आहे.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *