शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतीनिधी जळगाव जामोद शक्ती आणि भक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र. भारतीय संस्कृती ही मातृ देवो भव आहे आणि म्हणूनच दरवर्षी सन्मान परिवार जळगाव जामोद तर्फे साजरा करण्यात येणारा *कन्या सन्मान – कन्या पूजन* कार्यक्रम पहिल्यांदाच *जळगाव जामोद शहरापासून 18 किलोमीटर दूर , मैलगडाच्या पायथ्याशी , हिरव्या कंच सातपुड्याच्या सानिध्यात , दुर्गम आदिवासी ग्राम रायपुर येथे राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संत, शिक्षक ,सन्मान परिवार , पञकार व आदिवासी गावकरी* यांच्या उपस्थितीत दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ला संपन्न झाला. याप्रसंगी माऊली आश्रम मोहिदेपूर येथील माऊली महाराज म्हणाले की, स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहेच . स्त्री जवळ ईश्वराने दिलेली नवनिर्मितीची, घरावर , समाजावर संस्कार करण्याची क्षमता असते. स्त्री ही अनेक रूपातून म्हणजे मुलगी, पत्नी ,माता या अवस्थेतून जात असताना ती धर्मही पाळते म्हणून धर्मासोबत कर्माची जोड लागल्यावर त्याचा इतिहास बनतो . या कन्या सन्मान कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रायपूर येथील 31 विद्यार्थीनींचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. त्यांचे पूजन करत त्यांना भेट स्वरूपात शालेय व इतर वस्तूंचे वाटप डॉ सौ.अपर्णाताई कुटे , सौ.आरती फाफट , सौ.भारसाकडे मॕडम ,सौ सारिका देशमुख , सौ. लता तायडे , सौ सातव मॅडम , येऊलताई , चैताली मानकर , सौआरती पलन यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी डॉ.अर्पणाताई कुटे, गटविकास अधिकारी श्री शिवशंकर भारसाकळे , गटशिक्षणाधिकारी अधिकारी फाळके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी जावरकर , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख , राज्य संघटक अभिमन्यु भगत, डॉक्टर नंदू तायडे , सन्मान परिवाराचे प्रा.श्याम फाफट , तुकाराम कोकाटे ,जफर बेगसर, महादेव सातव , रवी बोडखे, अजिंक्य टापरे , पत्रकार अर्शद ईक्बाल, विठ्ठल गावंडे तसेच सन्मान परिवाराचे राजेश कोकाटे ,दिगंबर हिवरकर ,वैभव अढाव , सुनिल राजपूत तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षक अनिल भगत यांनी केले. [ अमेरिकेतील दातृत्व पोहोचला रायपुर मध्ये ] [आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक अनिल भगत करत असलेले प्रयत्न व शाळेत राबवित असलेले विविध उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असल्यामुळे अमेरिका स्थित सौ पूजा स्वप्निल चौधरी यांनी शाळेतील सर्व 31 विद्यार्थिनींना दिवाळीनिमित्त रंगबेरंगी कपडे व शाळेतील विद्यार्थ्यांना गणितीय खेळ कन्या सन्मान कन्या पूजन कार्यक्रमानिमित्त भेट स्वरूपात दिले .]
[आदिवासी नृत्याची मेजवानी ] [कन्या सन्मान कन्या पूजन कार्यक्रमानिमित्त स्थानिक कोरकू आदिवासी नागरिकांनी त्यांची पारंपारिक वेशभूषा करत पारंपारिक वाद्यासह लोक नृत्य सादर केले. लोकनृत्य सन्मान परिवाराच्या मातृ शक्तीने सुद्धा सहभाग घेतला.]