📰 पारडी पोलिसांची मोठी कामगिरी : दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक, ₹३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त 💰🚨
नागपूर | पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने चोऱ्यांच्या मालिकेला आळा घालत एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दारू दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण ₹३,१७,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी सतीश नारायण राऊत (वय ४६), रा. योगेश्वर नगर, दिघोरी, नागपूर यांचे प्रजापती नगर मेट्रो स्टेशनशेजारी सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. १२ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते १३ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकावून ₹३७,००० रोख रक्कम चोरी केली होती.
या प्रकरणी पारडी पोलिसांनी कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी राहुल मुकेश कोकोडे (वय २४), रा. जयभारत शाळेजवळ, भांडेवाडी, नागपूर यास ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह —
२) बंटी,
३) विजय उर्फ काल्या हंसराज निर्मलकर (रा. चिखली झोपडपट्टी, कळमणा) — यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने —
-
ऑटो (MH 49 E 1067)
-
हिरो डिलक्स (विना नंबर प्लेट)
-
देशी दारू भिंगरी संत्रा नं.१ च्या १८० मिलीच्या ९० बाटल्या
असा एकूण ₹३,१७,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून, इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई मा. श्री. राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रभाग), मा. श्री. निकेतन कदम (उप पोलीस आयुक्त, परिमंडळ ५), आणि मा. श्री. सत्यवीर बंडीवार (सहाय्यक पोलीस आयुक्त, जरीपटका विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वपोनि. श्रीमती नंदा मनगटे, पोउपनि. अरविंद कोल्हारे, पोहवा. नितीन बोबडे, भोजराज प्रधान, पोअं. संदीप ढाले, व गौरव युवते यांनी सहभाग घेतला. 👮♀️👏
Users Today : 22