अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गणित मोडीत — कापूस, तुरीचे मोठे नुकसान

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी
दिवाळी उत्सवानंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. *२९ ऑक्टोबर रोजी रात्री दीड ते दोन तास पडलेल्या अवकाळी पावसामुळे* कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागांत *वादळी वाऱ्यासह गडगडाट व विजांचा कडकडाट* झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पावसामुळे *शेतातील कापूस भिजला, ओंबे ओलाव्याने जमिनीवर पडले, तर **तुरीचा फुलोरा गळून पडल्याने उत्पादनावर परिणाम* झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल वाळवणीसाठी टाकलेला होता, तोही पावसाने भिजल्याने नुकसान झाले.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असताना, अचानक आलेल्या पावसाने *सोयाबीन आणि कापसाच्या शेवटच्या काढणीवर पाणी फिरवले.* ग्रामीण भागात रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे *रब्बी हंगामासाठीचे आर्थिक नियोजन कोलमडले* आहे. कापूस आणि सोयाबीन विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर बियाणे, खते आणि इंधनाचा खर्च भागवायचा असतो. मात्र, पिकाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस *हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता* व्यक्त केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, *पिकविमा आणि भरपाई योजना केवळ नावापुरती* राहिली असून, प्रत्यक्षात नुकसान झालेल्यांना दिलासा मिळत नाही. बदलत्या हवामानामुळे शेतीचे संकट अधिक तीव्र झाले आहे आणि *ग्रामीण भारताच्या अस्तित्वाशीच हा प्रश्न निगडित झाला आहे

0 9 5 5 2 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *