कारंज्यात प्रहारच्या मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन — शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग, मच्छीमार व मेंढपाळांना न्यायाची मागणी

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी
शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी *प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू* यांच्या नेतृत्वाखाली *२८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे “महाएल्गार आंदोलन”* पुकारण्यात आले. या आंदोलनाला *कारंजा येथे ३० ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलनाद्वारे पाठिंबा* दर्शविण्यात आला.

प्रमुख मागण्या शासनाने घोषीत केल्याप्रमाणे *शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा*शेतमालाला हमीभाव मिळावा*दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे*मच्छीमार आणि मेंढपाळांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात*

या मागण्यांसाठी गेल्या *आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.* निवडणुकीपूर्वी सत्तेत आलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अजूनही पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत *“आश्वासन नाही, अंमलबजावणी हवी”* असा आवाज आंदोलनात घुमला.

नागपूर येथील महाएल्गार आंदोलनाला समर्थन म्हणून कारंजा येथे झालेल्या जेलभरो आंदोलनात *ओमप्रकाश तापडिया, गजानन अमदाबादकर, गोपाल ठाकरे, प्रमोद ठाकरे, राजुभाऊ बिजवल, विश्वासराव देशमुख, श्रीकृष्ण नेमाने आणि पुंडलीकराव कडू* यांनी सहभाग घेतला.

आंदोलनकर्त्यांना *कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी तात्पुरते स्थानबद्ध केले.*

या आंदोलनातून प्रहार कार्यकर्त्यांनी शासनाला इशारा दिला की —

> “जोपर्यंत शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही.”

0 9 5 5 2 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *