दोन दुचाकींची समोरासमोर धडक — भीषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

KHOZ MASTER
1 Min Read

चैत्रबन (ता. मलकापूर) :

नागपूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चैत्रबन धाब्याजवळ ३० ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास १ वाजता दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात मृत झालेले तिघे म्हणजे —
सदाशिव राठोड, रा. गिरडा ता. मानोरा, जि. वाशीम
सदाशिव राठोड
किसन नंदू भोकरे, रा. सावरखेड ता. पातूर, वय २० वर्षे

तर राजू लठाड, रा. कोळदरा, वय २७ वर्षे हे गंभीर जखमी असून त्याच्यावर वाशीम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे स्वरूप

मिळालेल्या माहितीनुसार किसन भोकरे आणि राजू लठाड हे दोघे एम.एच.३० बीजे.५४४५ क्रमांकाच्या स्लेंडर दुचाकीवरून शेलूबाजारकडे जात असताना, समोरून येणाऱ्या एम.एच.३७ एएल.५४८९ क्रमांकाच्या होंडा युनिकॉन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की, एका दुचाकीवरील दोघांचा आणि दुसऱ्या दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची तत्काळ उपस्थिती

अपघाताची माहिती मिळताच जऊळका पोलीस स्टेशनचे कर्मचारी गजानन काटेकर, पंजाबराव घुगे, गणेश थोरात, निरंजन वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

या घटनेचा पुढील तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *