राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत चिखलीची रेवती नखोद चमकली

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा नागपूर येथे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेत चिखली येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील रेवती गजानन नखोद हिने १७ वर्ष वयोगटात (ओपन साईड खेळ प्रकारात) अप्रतिम प्रदर्शन करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि रजत पदक मिळवले.

या कामगिरीमुळे रेवती आता भोपाळ (म.प्र.) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण चिखली शहरात आनंदाचे वातावरण आहे.

विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके, पर्यवेक्षक जयेश सावजी, शिक्षक प्रतिनिधी गजानन वायाळ, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचा सत्कार केला.
रेवतीला हालेलुया शूटिंग रेंजचे प्रशिक्षक संजिव यंगड आणि विद्यालयाचे कला व क्रीडा शिक्षक कैलास करवंदे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

रेवतीच्या या यशामुळे चिखली शहराचा गौरव वाढला असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 9 5 5 2 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *