मलकापूर :
‘*विठ्ठल नामाचा गजर म्हणजे आत्म्याची जागृती आणि संतवाणी म्हणजे जीवनाची दिशा,’ या भावपूर्ण शब्दांत भक्तिभाव व्यक्त करत मलकापूर येथील **श्रीराम हनुमान मंदिर, हरीकिरण सोसायटी येथे ‘सांप्रदायिक काकड आरती’ या पुस्तकाचे प्रकाशन* करण्यात आले.
या प्रसंगी *श्रीराम हनुमान मंदिर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष केदार एकडे, उपाध्यक्ष **सुनील राजपूत, **ज्ञानदेव पाटील, **दामोदरदास लखानी, **बाळू राणे, **पांडूमामा पाचपांडे* तसेच *हभप शरद महाराज* उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक *पवार* यांनी केले.
*काकड आरती — भक्तिसंस्कृतीचा आत्मा*
काकड आरतीची परंपरा ही *महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय* मानली जाते. दरवर्षी *अश्विन कोजागिरी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत पहाटे पाच ते सात या वेळेत* ही आरती भाविक श्रद्धेने केली जाते. भक्तिभावाची ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रभर *एकसमान पद्धतीने टिकावी*, या हेतूने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
📖 *पुस्तक निर्मिती आणि मार्गदर्शन*
या पुस्तकाचे संकल्पना व मार्गदर्शन *ह.भ.प. विजय भंगाळे महाराज (माळेगावकर)* यांनी केले असून, *प्रा. प्रदीप खर्चे (शेलगाव बाजार)* यांनी संतांच्या वाणीतील अभंगांची *सांप्रदायिक पद्धतीने रचना* करून हे पुस्तक साकारले आहे.
*भक्तांचा सत्कार आणि भक्तिभावाचा सोहळा*
परिसरातील सर्व *काकड आरती मंडळांना प्रत्येकी पाच पुस्तके देऊन सत्कार* करण्यात आला. भक्तांच्या सहकार्याने आणि *श्रीराम हनुमान मंदिर सेवा ट्रस्टच्या आयोजनामुळे* हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व भावपूर्ण वातावरणात पार पडला.
श्रद्धा, परंपरा आणि संतवाणीचा संगम असलेला हा सोहळा मलकापूरच्या भक्तिमय वातावरणात दीर्घकाळ लक्षात राहील, असे सर्व उपस्थितांनी नमूद केले.
Users Today : 28