बुलढाणा :
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेवर *शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन **शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी* यांनी केले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री *मा. एकनाथ शिंदे* यांच्या आदेशानुसार आयोजित ‘शिवसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. मापारी यांनी भूषवले होते.
या वेळी *तालुकाप्रमुख भगवान सुलताने, **नीरज रायमूलकर, **सुनील सुलताने, **डॉ. प्रदीप मोरे, **शैलेश सरकटे, **संतोष आघाव, **गणेश डव्हळे, **भागवत डव्हळे, **माऊली जायभाये, **विजय सोनुने, **विजय डोईफोडे, **नंदू इंगळे, **समाधान साठे, **तुळशीराम जाधव, **मनोज ताबिले, **राजू तांबिले, **विठ्ठल घायाळ, **किशोर भाग्यवंत, **संजय घायाळ* यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
प्रा. मापारी म्हणाले,
> “विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी झालेला पराभव आपल्यासाठी मोठा धडा आहे. कार्यकर्तेच ठेकेदार झाल्यामुळे गावा-गावात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, हेही पराभवाचे एक कारण ठरले. मात्र, यापुढे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने काम केल्यास येणाऱ्या *जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे.*”
ते पुढे म्हणाले,
> “विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्या गावात कोण बाजूला गेले हे सर्वांना माहित आहे. त्यांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न करा. निवडून आलेल्या आमदाराने आजवर मतदारसंघासाठी एक रुपयाचा निधीही आणलेला नाही, त्यामुळे विरोधी आमदाराला निवडून दिल्याचा पश्चाताप जनतेला होत आहे.”
शेवटी प्रा. मापारी यांनी *शिवसैनिकांना परस्परांतील मतभेद व गटबाजी विसरून एकसंघपणे प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी मैदानात उतरावे*, असे आवाहन करत सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
