मलकापूर :
“प्रत्येक बालकाला प्रेम, शिक्षण आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे. शासनाच्या विविध योजनांमधून दिव्यांग बालकांना कुटुंबाच्या रूपाने आधार देणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे मत *तहसीलदार राहुल तायडे* यांनी व्यक्त केले.
मलकापूर तालुका बाल संरक्षण समितीच्या वतीने आयोजित बैठकीत *राज्य मिशन वात्सल्य योजना* प्रभावीपणे राबविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान तहसीलदार तायडे यांनी भूषवले.
🗂️ बैठकीत त्यांनी शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार तालुक्यातील *एकल, विधवा आणि परित्यक्ता महिलांना वारस प्रमाणपत्र तसेच मालमत्तेवरील हक्क मिळवून देण्यासाठी* ठोस कार्यक्रम आखण्याचे निर्देश दिले. तसेच *२७ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश* देण्यात आले.
या बैठकीस *नगरपरिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा तालुका सचिव अलका धाडे, **जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, तसेच **संस्कृती सामाजिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मंगेश खराटे* उपस्थित होते.
बैठकीदरम्यान *शहरी आणि ग्रामीण भागातील अत्यंत काळजीच्या गरजू दिव्यांग बालकांना प्रायोजकत्व देऊन कुटुंब आधारित सेवा बळकट करणे, तसेच **विधवा व परित्यक्ता महिलांना रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे* यावर भर देण्यात आला.
मिशन वात्सल्य समितीच्या सदस्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा *थेट आणि प्रभावी लाभ पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना* दिल्या.
