सराफ असोसिएशन नुतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष पदी गणेशशेठ शहाणे उपाध्यक्ष श्री सुधाकर खरात श्री संतोष शहाणे याची निवड

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा..

मंठा दिनांक 31/10 /2025 रोजी मंठा येथे गणेश मंगल कार्यालय उस्वद रोड मंठा येथे सराफा असोसिएशन चे दीपावली निमित्त स्नेह मिलन चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंठा सराफा असोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित मंठा सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष बाबुराव शहाणे मंठा सराफाचे माजी अध्यक्ष भगवान गोविंदराव शहाणे व प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरी या दैनिकाचे वार्ताहार दिनेश जोशी समाधान जनरल स्टोअर्स चे मालक शिवाजीराव मोरे शिवसेना नेते जुगल किशोर शेठ दायमा (पप्पू सेठ) सतीश दादा गोरे कपिल भैया तिवारी गजानन माळकर आकाश भैया राऊत मुन्ना भैया ढवळे व नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश राव बाबासाहेब शहाणे व नवनिर्वाचित

सचिव शिवाजी बापू ढवळे व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमोल शहाणे व मंठा शहरातील सर्व सराफ व्यापारी व कारागीर यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या समक्ष कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष श्री गणेश बाबासाहेब शहाणे उपाध्यक्ष श्री सुधाकर भिमराव खरात उपाध्यक्ष श्री संतोष अंबादासराव शहाणे कार्याध्यक्ष श्री पांडुरंग साहेबराव पडुळ सहकार्याध्यक्ष श्री योगेश अंबादासराव शहाणे जिंतुरकर सचिव श्री शिवाजीराव ढवळे (बापू) सह सचिव मधुकर धोंडीराम चव्हाण कोषाध्यक्ष विष्णुपंत गोविंदराव शहाणे सह कोषाध्यक्ष सुरज संजयराव शहाणे सल्लागार सचिन सदाशिवराव दहिवाळ सल्लागार विजय अच्युतराव सराफ सल्लागार अमोल बबनराव खरात सल्लागार कैलास रंगनाथ दहिवाळ सल्लागार निलेश सुनील जोजारे सल्लागार दिलीप बाबासाहेब कळणे सल्लागार सूर्यकांत गौंडगे सल्लागार विनायक अंबिलवादे. सर्व व्यापारी सन्माननीय सदस्य अशी आहे. यावेळी सूत्रसंचालन मोठा लॉयन्स क्लबचे अध्यक्ष वैभव गणेशराव शहाणे यांनी केले व आभार सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमोल शहाणे यांनी केलं

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *