रन फॉर युनिटी’ उपक्रमात चिखलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पोलिसांच्या पुढाकारातून कार्यक्रम

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली, दि. ३१ (प्रतिनिधी)

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे चिखलीत उत्साहात आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून, तसेच ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक क्रीडा संकुलावर करण्यात आले.

कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर ‘रन फॉर युनिटी’ला सुरुवात झाली, ज्यामध्ये चिखली शहरासह परिसरातील शेकडो नागरिक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी आणि सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरात एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देत सहभागी धावपटूंनी घोषणाबाजी केली.

या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि नागरिकांमधील एकोपा यांचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी धावपटूंना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *