डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी)
स्थानिक डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे संचालक पी. पी. खर्चे यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्याध्यापक ए. पी. बोरसे यांनीही पुष्पहार अर्पण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी त्यांनी सांगितले की, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून राष्ट्रीय एकता प्रस्थापित केली. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते.”

कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक बी. जे. इंगळे, पर्यवेक्षक पी. बी. महाजन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *