बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी
देशाच्या एकतेसाठी आणि मायभूमीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी स्व. इंदिरा गांधी तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रणेते, देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अजरामर असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले.
चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती या निमित्ताने जनसेवा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. या वेळी इंदिराजी गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, “इंदिराजींनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणार्पण केले, तर सरदार पटेल यांनी संस्थानांचे विलिनीकरण करून भारताची अखंड राष्ट्रीय ओळख प्रस्थापित केली. त्यांचे कार्य हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.”
या वेळी शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर, समन्वयक प्रा. राजू गवई, संघटक अतहरोद्दीन काझी, डॉ. मोहमद इसरार, कुणाल बोंद्रे, प्राचार्य निलेश गावंडे, रिक्की काकडे, राजू रज्जाक, आसिफ, मिलिंद पालवे, बंडु कुलकर्णी, गोपाल देव्हडे, दीपक थोरात, विलास कंटुले, अमिनखॉ उस्मानखॉ, आरिफ, शेख जाकीर, कैलास खराडे, जय बोंद्रे, रोहन पाटील, सदुनाना ठेंग, नजिर कुरेशी, रविंद्र वानखेडे, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, सचिन शेटे, प्रकाश वानखेडे, पवन गवारे, अमोल जाधव, अशोक खरात, अंबादास चिंचोले, प्रा. राजेंद्रकुमार गवई, विजय सोनवाळ, अशिष गवई, विशाल पवार, सुरेश बोंद्रे, सोहेल शेख, व्यंकटेश रिंढे, राजीक जमदार आदी मान्यवर उपस्थित
