अमडापूर पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रीय एकता दिन’ उत्साहात साजरा — ‘रन फॉर युनिटी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Khozmaster
1 Min Read

अमडापूर, दि. ३१ (प्रतिनिधी)

भारतातील लोहपुरुष आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन अमडापूर पोलीस स्टेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेत देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या निमित्ताने “वॉक / रन फॉर युनिटी” या पाच किलोमीटरच्या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा अमडापूर बसस्टॉप ते उदयनगर टोल नाका या मार्गावर पार पडली. या उपक्रमात सुमारे २०० ते २५० नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. रॅलीदरम्यान सहभागी नागरिकांनी देशातील ऐक्य, अखंडता आणि बंधुतेचा संदेश देत “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषणांनी परिसर दुमदुमवला.

या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार निखिल निर्मल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस अंमलदार, पोलीस पाटील, होमगार्ड, तसेच स्थानिक नागरिक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण करून भारताच्या एकसंघतेचा संदेश देत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

0 9 5 5 2 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *