सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी)
भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती शैला ए., जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा नाझर मोतेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देशाच्या एकतेसाठी सरदार पटेल यांनी केलेल्या कार्याचा आणि इंदिरा गांधी यांच्या दृढ नेतृत्वाचा उल्लेख करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *