लोणार बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी)
लोणार बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे यांनी तातडीने बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली असून, तसे न झाल्यास बसस्थानक कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

एसटी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून लोणार बसस्थानक परिसरात महिलांच्या चैन स्नॅचिंग, पर्स आणि मोबाइल चोरी, खिशातील पाकीट लंपास होणे अशा घटना वाढल्या आहेत. याशिवाय महिला व शालेय मुलींच्या छेडछाडीच्या तक्रारीही वाढल्या असून, या घटनांमुळे प्रवाशी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

गुन्हेगारी घटनांना आळा बसावा आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली. यामध्ये तालुकाप्रमुख राजू बुधवत, शहरप्रमुख गजानन जाधव, सुदन अंभोरे, प्रकाश सानप, श्रीकांत मादनकर, इकबाल कुरेशी, तानाजी अंभोरे, समाधान साळवे, अमोल सुटे, अशफाक खान, फहीम खान, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अमोल पसरटे, प्रसेंजित बच्छीरे, समर्जीत बच्छीरे यांचा समावेश आहे.

निवेदनकर्त्यांनी पंधरा दिवसांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्यास बसस्थानक कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *