शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार : माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे आवाहन – “जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करून पक्ष अधिक बळकट करा”

KHOZ MASTER
2 Min Read

खामगाव, दि. २३ (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारधारेवर चालणारा सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी जनतेच्या अडीअडचणी सोडवून पक्ष अधिक मजबूत करावेत, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

खामगाव शहराध्यक्षपदी सरस्वती खासने आणि तालुकाध्यक्षपदी मनोज वानखडे यांची निवड झाल्यानिमित्त राणा फाऊंडेशन तर्फे २३ ऑक्टोबर रोजी टॉवर चौकातील राजीव गांधी उद्यानात “एक दिवा महाराणाजींसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मंचावर अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा, ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख, विश्वपालसिंह जाधव, बाजार समिती सभापती सुभाष पेसोडे, लायसन कमिटी सभापती विलाससिंह इंगळे, मनोज नगरनाईक, अशोकबाप्पु देशमुख, महेंद्रसिंह राठोड, केशव कापले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सरस्वतीताई खासने यांचा अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि फेटा बांधून, तर मनोज वानखडे यांचा अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी गिता महातो, शारदा शर्मा, तृप्ती गोडबोले, रोहित राजपुत, मुन्ना बोंद्रे, कृष्णा नाटेकर, सलीम, अजय ठाकुर, प्रताप कदम, सत्तू शर्मा, निलेश बोराडे, अमोलसिंह ठाकुर, तुषार चंदेल, संतोष महातो, प्रमोदसिंह राजपुत, कैलाससिंह राजपुत, प्रफुल कुळकर्णी, निखील राठोड, करण राजपुत, सुरेंद्र चव्हाण, सतीष तिवारी, सुरेश बोरकर, श्याम मोरे, आनंद किलोलीया, शुभम मिश्रा, धनंजय वानखडे, अभिषेक जुनघरे, अरविंद ढगे, गणेश राजपुत, पिंटु जाधव, वसंता चिखलकर, हमीद खान, शत्रुघ्न इंगळे, प‌द्माकर धुरंदर, मिलींद धुरंदर, वैभव वानखडे, गोपाल क्षिरसागर, अंजुम पठान, सैयद इमरान, अजिज चायवाले, शेख अजीम कुरेशी, मुकद्दर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *