रुईखेड मायांबा सरपंच सुरेखा फेपाळे यांना ‘ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ प्रदान

KHOZ MASTER
1 Min Read

चांडोळ, दि. २६ (तालुका प्रतिनिधी)
बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा अनिल फेपाळे यांना यावर्षीचा “महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. पंचायत राज मंचाच्या वतीने दरवर्षी राज्यातील उल्लेखनीय विकासकामे करणाऱ्या सरपंचांना हा सन्मान दिला जातो.

सरपंच सुरेखा फेपाळे यांनी रुईखेड मायांबा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवलेल्या विविध ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. पंचायत राज विकास मंचाने प्रत्यक्ष गाव भेट देऊन फेपाळे यांच्या कामाची पाहणी केली व त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे नमूद केले.

२६ ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे झालेल्या अखिल भारतीय सरपंच परिषद संलग्न पंचायत राज विकास मंच आयोजित ग्रामरत्न सरपंच पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे, तसेच यशदाचे संचालक मल्लिनाथ कलशेटी हे मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल रुईखेड मायांबा ग्रामस्थांनी सरपंच सुरेखा फेपाळे यांचा सत्कार करून अभिनंदन व्यक्त केले, तसेच त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *