मुंबईत ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा’ सत्याचा मोर्चा : मतदारयाद्यांतील घोळ आणि संविधानविरोधी शक्तींविरोधात आंदोलन

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा (प्रतिनिधी)

लोकशाहीचे संरक्षण आणि मतदारयादीतील घोळ, खोट्या मतदार नोंदी तसेच संविधानविरोधी शक्तींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा – सत्याचा मोर्चा’ या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटपासून सुरू होणार आहे.

या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही एका पक्षाचा नव्हे, तर लोकशाही आणि सत्यासाठी लढणाऱ्या सर्व सजग नागरिकांचा आवाज म्हणून आयोजित केला जात आहे. असत्य, अन्याय आणि लोकशाहीविरोधी कारवायांविरोधात हा आंदोलनाचा निर्धार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

मोर्चाद्वारे मतदारयादीत खोट्या नोंदी करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तसेच या आंदोलनातून महाराष्ट्रातील जनता संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी एकजूट असल्याचा संदेश दिला जाणार आहे.

शिवसेनेच्या वतीने पक्ष प्रवक्ता अॅड. जयश्री शेळके यांनी आवाहन केले की,

“लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर गदा आणणाऱ्या आणि मतदार ओळख प्रक्रियेत गोंधळ निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनता रस्त्यावर उतरत आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या सत्याच्या मोर्चात सहभागी होणे ही काळाची गरज आहे.”

निगरगट्ट झालेल्या महायुती सरकारच्या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी आणि जनतेच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *