शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीकडून सोयाबीन खरेदी ५ नोव्हेंबरपासून

Khozmaster
2 Min Read

चिखली (प्रतिनिधी)

बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन थेट विक्रीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपला माल थेट कंपनीच्या कार्यालयात आणावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

सोयाबीन खरेदीची प्रक्रिया ५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार असून खरेदीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. खरेदी दररोज चालू राहणार आहे. ही खरेदी बुलडाणा अर्बनचे वेअरहाऊस परिसर, एमआयडीसी, चिखली येथे केली जाणार आहे.
सभासदत्व आवश्यक

ज्या शेतकऱ्यांना कंपनीचे सभासद नाहीत, त्यांनी ७/१२ उतारा आणि ५०० रुपये वर्गणी सोबत आणून सभासदत्व घ्यावे. सभासद झाल्यानंतरच विक्रीस परवानगी दिली जाईल.
तत्काळ रकमेचा लाभ

सोयाबीन विक्रेत्या शेतकऱ्यांना त्या दिवसाच्या बाजारभावानुसार रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. याशिवाय कंपनी जेव्हा सोयाबीन विक्री करेल, त्यावेळी जो नफा होईल त्यातून संबंधित शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल.

गुणवत्ता निकष

सोयाबीनमध्ये मॉइश्चरचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. डागी, मातीमिश्रित किंवा दर्जाहीन सोयाबीन स्वीकारले जाणार नाही. माती असल्यास तिच्या प्रमाणानुसार वजनात कपात केली जाईल.
कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हमाली, अडत किंवा बारदानाचा कोणताही खर्च करावा लागणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले सोयाबीन सुरक्षित, पारदर्शक आणि नफ्याच्या व्यवहारात विकावे, असे आवाहन फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

0 9 5 5 3 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *