मलकापूर (प्रतिनिधी)
तालुक्यातील विवरा येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मलकापूर तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाव’ आंदोलन करण्यात आले.
गत २६ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे विवरा परिसरातील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री संजय सावकारे, आमदार चैनसुखी संचेती, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे आणि तहसीलदार राहुल तायडे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी विवरा येथील सर्व नुकसानग्रस्तांना शंभर टक्के भरपाई द्यावी असे आदेश दिले होते.
मात्र, एक महिना उलटूनही नुकसानग्रस्तांना अनुदान न मिळाल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा बिगुल वाजवला. डफडे वाजवत, घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर आणि विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांनी आठ दिवसांच्या आत नुकसानभरपाई वितरित न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
✊ आंदोलनात उपस्थित
आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, उपशहर प्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम, विभाग प्रमुख चांद चव्हाण, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेंहेंगे, तसेच राजू नेवे, पद्माकर लांडे, बंडू पाटील, श्रीकृष्ण चोपडे, हरी तळेकर, मधुकर कडू, चंद्रभागा मोरे, कमल शिंदे, योगेश बिल, दिलीप वराडे, रमेश चौधरी, रहीमभाई बागवान आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर नायब तहसीलदार चौधरी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये विवरा येथील सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तत्काळ अनुदान वितरित करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
Users Today : 33