बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी –
माँ साहेब जिजाऊ चा जिल्हा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सर्वात अनुभवी व कुशल सर्पमित्र म्हणुन प्रसिद्ध असलेले श्रीराम रसाळ सर यांना वन्यजीव क्षेत्रात अतिशय महत्वाचे समजल्या जाणाऱ्या एक नव्हे तर तब्बल तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्काराने ते करत असलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या मुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या बाबतीचे निवड पत्र आयोजकांच्या वतीने नुकतेच श्रीराम रसाळ यांना प्राप्त झाले आहे.
सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कारा मध्ये प्रामुख्याने ओंजळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा आयोजित शिवराजमुद्रा संमेलन 2025 मध्ये दिला जाणारा मानाचा शिव राजमुद्रा सन्मान पुरस्कार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी जेष्ठ अभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते सौ.वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह, शिवाजी हाउसिंग सोसायटी, कराड-सातारा येथे देण्यात येणार आहे.
तसेच वर्ल्ड फॉर नेचर इंडिया जिल्हा शाखा रत्नागिरी द्वारा आयोजित निसर्ग मित्र मेळावा व पहिला राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2025 सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल श्रीराम रसाळ यांना वर्ल्ड फॉर नेचर आदर्श निसर्ग सेवक पुरस्कार 2025 व सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार 2025 या दोन मानाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वन्यजीव क्षेत्रात भरीव अशी कामगिरी करणाऱ्या करीत महत्वाचे समजल्या जाणारे तिन्ही मानाचे पुरस्कार श्रीराम रसाळ यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर हितचिंतका च्या वतीने शुभेच्छा चा वर्षाव होत आहे..
Users Today : 33