सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा

भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी विरंगुळा भवन आठवडी बाजार येथे देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव , स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,जनसेवा सामाजिक समिती तथा जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली , सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी , सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष श्री.गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड, गोविंदराव बोरकर,मधुकरराव धुळे, रमेश नरोडे , प्रकाश अहिरे प्रा.अशोक डोईफोडे ,प्रा. विनायक कुलकर्णी , धनसिंग शिंपणे , पंडितराव पाथरकर, रामदास कुलथे , मार्तंड आप्पा घिके, विनोद जाधव, घनश्याम भंडारे, उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, याप्रसंगी वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड यांची बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महासचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव . गोविंदराव बोरकर यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *